TIPS लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
TIPS लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

कशी घ्याल आपल्या मानसिक आरोग्याची काळजी?

 

कशी घ्याल आपल्या मानसिक आरोग्याची काळजी?

 

निरोगी शरीर, रोगप्रतिकारक शक्ती , तंदुरुस्त राहा आणि आनंदी राहा असे अनेक सल्ले आपण सध्या ऐकत असतो. पण तरीही ज्या परिस्थिती मधून आपण जात आहोत त्या स्थितीमध्ये या गोष्टी वाटता तितक्या सोप्या नाहीयत हे हि आपण जाणतोच. नैराश्या मध्ये गेलेल्या आणि आत्महत्या केलेल्या किती तरी घटना रोज घडत आहेत. रोगांशी लढण्यासाठी शरीराची तंदुरुस्ती महत्वाची आहेच पण तंदुरुस्त आणि निरोगी राहण्याचा महत्वाचा भाग म्हणजे स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे.

कशी घ्याल मानसिक आरोग्याची काळजी ? मानसिक आरोग्य. नैराश्य , नैराश्य उपाय.  मानसिक तंदुरुस्ती , झोपेचे उपाय . आनंदी कसे राहावे. निरोगी कसे राहावे. निश्चिंत कसे राहावे ? Mental Health. depression. how to be happy? how to be stress free. how to be peaceful. how to take care of mental health?

निरोगी, तंदुरुस्त आणि आनंदी राहण्याचा मुख्य मार्ग आहे आपले मानसिक आरोग्य निरोगी आणि तंदुरुस्त ठेवणे म्हणजे नैराश्याला पळऊन लावण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. आणि हो यासाठी खूप विशेष गोष्टी करण्याची गरज नाहीय आपण फक्त खालील गोष्टींची काळजी घेतलात तर आपले मानसिक आणि त्यामळे साहजिकच शारीरिक आरोग्यही तंदुरुस्त राहील.

 

शक्य तितका जास्त सूर्यप्रकाश मिळवा  

       आता आपण म्हणाल सूर्यप्रकाशाचा आणि मानसिक आरोग्याचा काय संबंध असा प्रश्न आपल्याला पडलाच असेल! तर वाचक मित्रांनो सूर्यप्रकाशाचा खरंच फार महत्वाचा संबंध आहे आपल्या मानसिक आरोग्याशी. वैज्ञानिक दृष्ठ्या सूर्यप्रकाश हा व्हिटामिन D चा स्त्रोत आहे, जे आपल्या शरीरासाठी आणि मेंदूसाठी हि महत्वपूर्ण जीवनसत्व आहे. हे जीवनसत्व आपल्या मेंदू ला अशा रसायनांचा पुरवठा करत जे एन्डोर्फीन  आणि सेरोटोनीन सारख्या मूडमध्ये सुधारणा करते. दिवसातून ३० मी ते २ तास हा कालावधी सूर्यप्रकाशात घालवणे आदर्श असते. जेव्हा टाळेबंदी केली गेली, त्यावेळी घरातून बाहेर पडणे शक्य न्हवते त्यावेळी बऱ्याच व्यक्तींना उदासीन आणि विनाकारण मानसिक ताण जाणवत होता अस बऱ्याच वेळी हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात हि होत, याच कारण असत पुरेसा सूर्यप्रकाश न मिळणे याला सिझनल एफेक्टेद डीसऑर्डर म्हणतात. यासाठी आपल्या मानसिक आरोग्यासाठी सूर्यप्रकाश खूप प्रभावी भूमिका बजावतो.

पुरेशी झोप घ्या

झोप आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी खरोखरच फार महत्वाची असते. झोपेमुळेच मेंदू ला पुरेशी विश्रांती मिळते व शरीरातील सर्व हार्मोन नियंत्रित करण्याचे कार्य अधिक प्रभावी होते. आपल्या भावना आणि आपली मनस्थिती ठरवण्यामध्ये झोप महत्वाची असते, पुरेशी झोप नाही मिळाली तर आपण निराश, चिंताग्रस्त किंवा थकलेले वाटू लागतो, आणि यामुळे विनाकारण चिडचिड होऊन आपले आरोग्य बिघडते. त्यामुळे पुरेशी झोप घ्या.

सकस आहार खा

चांगले खाणे हे फक्त शरीराची शक्ती वाढवते इतकेच नाही तर त्याचा सरळ परिणाम आपल्या मानसिक स्थितीवरही होतो. लोह, कॅल्शिअम आणि व्हिटामिन सी सारखी अत्यंत महत्वाची खनिजे आणि जीवनसत्वे यांची कमतरता आपल्याला मानसिक आरोग्यासाठी हि जबाबदार राहते. तणावग्रस्त किंवा चिंतातूर वाटत असेल तर संतुलित आहार घेण योग्य ठरू शकत.

मद्यपान आणि धृम्रापान टाळा

मद्यपान आणि धृम्रापान या गोष्टी चिंताग्रस्त किंवा तणावात राहणारे व्यक्ती तणाव कमी करण्यासाठी चा उपाय म्हणून करत असल्याचे भासवतात पण याचं गोष्टी खऱ्या अर्थाने तणाव आणि चिंताग्रस्तपणा वाढीस मूळ कारण ठरतात. मद्यपान किंवा धृम्रापान घेऊन तात्पुरते चिंतेपासून आणि तणावातून मुक्त झाल्याचा भास होतो पण ती फक्त एक नशा आहे हे ते लोकं ओळखू शकत नाहीत. त्या नशेचा अमल संपताच ते अधिकच उदास, चिंताग्रस्त आणि तणावाखाली जातात आणि पण एखाद्या गोष्टी वर लक्ष केंद्रित करणे किंवा एकाग्र होणे कठीण होते. यांच्या दीर्घकाळ वापराने शरीरात थायमिन ची कमतरता येते. थायमिन मेंदूच्या कार्यासाठी महत्वाचे आहे, याच्या कमतरते मुळे स्मरणाची समस्या, समन्वयाची समस्या, गोंधळ आणि डोळ्यांचा त्रास उद्भऊ शकतो, यामुळे एकूणच ती व्यक्ती चिडचिडी आणि चिंताग्रस्त बनते.

झोपेच्या आणि इतर गोळ्या डॉक्टरांच्या परवानगी शिवाय खाणे टाळा

अशी औषधे तात्पुरता आराम देतात आणि बऱ्याच वेळा चिंता वाढवतात आणि शारीरिक आणि मानसिक नुकसान करतात. अशा औषधांच्या अधिक वापराने स्कीझोफ्रेनिया सारख्या मानसिक विकृती विकसित करू शकतात.

तणावावर नियंत्रण मिळवा

अनेकदा तणाव टाळता येण शक्य असत, परंतु आपणच तणावाच्या मुख्य करणाला कुरवाळत बसतो आणि तो अधिकच वाढवतो. आपल्याला मानसिक ताण कशामुळे येतो हे जाणून घेणे आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी काय करणे गरजेचं तणावाला समोर कसं जावे याचे नियोजन करण गरजेचं आहे. प्रत्येक समस्सेच निराकरण केव्हा आणि कधी करू शकता याचे वेळापत्रक बनवुन आपल्या जबाबदाऱ्या आणि महत्त्वाचे मुद्दे व्यवस्थापित करा करण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच वेळा आपल्या तणावाची कारणे लिहून ठेवणे यामुळे तणाव व्यवस्थापित करणे आणि तीव्रता कमी करणे सोप होऊ शकत. संकटांपासून दूर पळणे थांबउन त्यांना सामोरे जा आणि समस्यांना तोंड द्या. समस्यांमुळे झोप येण्यामध्ये अडचण होत असेल तर मनपसंद संगीत ऐकून आपण यावर उपाय करता येतो.

दररोज व्यायाम करा

व्यायाम फक्त शरीर चांगले ठेवत नाही तर मानसिक आरोग्य राखण्यामध्ये आणि ताजेतवाने वाटण्यामध्ये हि व्यायामाचा खूप परिणाम होतो. सक्रीय राहण्याने आपण ताजेतवाने तर होताचं पण याच बरोबर मेंदूतील रसायनांना ही उत्तेजना मिळते व आपल्याला चांगल्या मनस्थिती मध्ये ठेवण्यास मदत करते. व्यायामाने जसे शरीर खंबीर होते तसेच मन हि खंबीर होते. व्यायाम नैराश्या, चिंता, ताण थकवा आणि आळशीपणा दूर करण्यास मोठी भूमिका पार पाडते. हाच व्यायाम तंदुरुस्ती आणि दीर्घायुशी देखील बनवतो हे विशेष.

आनंदी राहण्यासाठी आनंद घेत राहा

आपल्याला आवडणाऱ्या, मजेशीर आणि आनंद देणाऱ्या गोष्टी करण्यामध्ये वेळ देण्याचा प्रयत्न करा. फिरायला जाने, गाणी ऐकणे, एखादा विशेष छंद असणे अशा गोष्टींसाठी विशेष वेळ द्यायचा प्रयत्न करा. आपल्याला आवडत्या व्यक्तींशी चर्चा करा, कॉल किंवा मॅसेज वरून संपर्कात राहा. आपल्या अडचणी, चिंता किंवा अगदी दैनंदिन घटनाही शेअर करा. आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत अशा गोष्टी शेअर केल्याने तणाव कमी येण्यामध्ये कमालीचा परिणाम दिसून येतो.

 

सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

नात्यांची गरज “संवाद”

 

नात्यांची गरज “संवाद”

जशा प्रेमाच्या व्याख्या व्यक्तीशः बदलतात तसेच नात्यांच्याही बाबतीत आहे. दोन व्यक्तींमधील बंध मग तो कोणताही असुदे प्रियकरांमधील प्रेमाचा, आईवरील प्रेमाचा, आजी आजोबा, बहिण-भाऊ, भाऊ-बाबा किंवा अगदी निखळ मैत्रीचाच बंध, हे बंध म्हणजे मला वाटतं देवानं निर्माण केलेली नाती आणि त्यातला जिव्हाळाच.

natyachi garj. nate kase tikavave. नात्याची गरज . नाते कसे टिकवावे?  संवाद . नातेसंबंध.  प्रेम. communication. love.

या वेगवेगळ्या नात्यांमुळेच खरं म्हणजे आयुष्याला उभारी येते. माणूस पूर्णत्वाकडे जातो आणि समृद्ध होतो. जर उदाहरण सांगायचं झालं तर माझच सांगेन. बहिण हे नातं इतक सुंदर आहे की त्याची तुलना इतर  कुठल्याही नात्याशी होऊ शकत नाही. मला सख्या बहिणी नाहीत परंतु मला माझ्या चारही आते बहिनी सख्या नाहीत असे कधी वाटतच नाही. मी सगळ्यात लहान म्हणजे शेंडफळ, आणि ह्या माझ्या आतेबहिनी, आम्ही एकत्र राहतही नाही पण तरीही आमचे नाते अतूट आहे कारण आमच्या नात्यातील दुवा आहे संवाद .

किती अन काय काय करू शकतो हा संवाद?

दुरावलेली, विखुरलेली, अस्पष्ठ, अबोल नाती आणि अनोळखीही फक्त एका संवादामुळे अखंडपणे जोडली जाऊ शकतात. चार आपुलकीचे, मायेचे आणि काळजीचे शब्द नात्याचा अतूट बंध निर्माण करतात. नाती जपली पाहिजेत, टिकवली पाहिजेत अस फक्त म्हणत बसून नाती टिकत अगर जपली जात नाहीत. त्यासाठी आपला स्वतःचा ५ मीनीट वेळ सुद्धा खूप काही करू शकतो. हा ५ मिनिटांचा संवाद आपल नातं आयुष्यभर तारू शकतो.

एका संवादामुळे माणसाचा मूड कळू शकतो, संवाद हि शब्दांची देवाण घेवाण नसून ती भावनांची देवाण घेवाण आहे. त्यामुळे स्वभाव आचार-विचार आणि एकूणच संपूर्ण व्यक्ती कळून येते. आमची वाचकांना एक विनंती आहे कि आपण स्वतः आठवा की आपण कोणत्या नात्याला वेळ देत नाही आहोत, देऊ शकत नाही आहोत किंवा देणारच नाही आहोत! या महामारीचा काळात टाळेबंदी मुळे एकमेकांची प्रत्यक्ष भेट होणे सहज शक्य राहिलेलं नाहीये, पण यामुळे नाते तुटू न देणे हे आपलेच कर्तव्य असते. कारण नाती आयुष्यभराची, सुखादुखाची सोबती असतात.

जर दुरुवा आलाच असेल, चिडचिड आणि अबोला वाढतच असेल तर ते तुमच नातं तुमचा वेळ मागत आहे. अशा वेळी तुम्ही केवळ त्या तुमच्या नात्याला ५ मीनीट वेळ देऊन बघा. हा ठरवून केलेला संवाद ५ मिनिटे ओलांडून कधी एक तासाचा होऊन जाईल तुम्हालाच कळणार नाही.

चला तर मग या ओढावलेल्या दुराव्यामध्ये संवाद हे एकच माध्यम ठेऊन नाती जपण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करूयात.

धन्यवाद. 

 ©Team E Times Today

अशाच नवनवीन माहिती साठी, लेटेस्ट बातम्यांसाठी वाचत राहा

E Times Today



विचार मंथन , अनुभव , नातेसंबंध, प्रेरणादायी कथा, प्रेरणादायी लेख, मनातील हितगुज, मनातील गप्पा,  Article, blog,