E Times लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
E Times लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

तू दुःखहर्ता

तू दुःखहर्ता


      सूर्याआधी दर्शन घ्यावे तुझे मूषक ध्वजा

      शुभद सुमंगल सर्वांआधी तुझी पाद्यपूजा 

      अशा गणरायाचे आपल्याकडे आगमन झाले आहे. वर्षभर ज्याची आपण सगळे आतुरतेने वाट पाहात असतो त्या लाडक्या बाप्पाची आज घरोघरी प्रतिष्ठापना झाली आहे. दरवर्षीचा गाजावाजा या वर्षी नसला तरी प्रत्येकाचा उत्साह मात्र तोच आहे. आज प्रत्येकजण या आधीच्या गणेशोत्सवाच्या आठवणी काढत हा उत्सव आज साजरा करीत आहे. 

      गोकुळ अष्टमी झाली की सर्वांनाच वेध लागतात ते गणरायाच्या आगमनाचे आणि तशी तयारीही आपापल्यापरीने प्रत्येक घरात सुरू होते. बाप्पाची मूर्ती निवडण्यापासून सुरुवात होते. आजही गावी आपापल्या गणपतीच्या मूर्तीसाठी गणपतीच्या मूर्ती बनविणाऱ्या कलाकारांकडे(कुंभारवाड्यात) बाप्पासाठी पाट नेऊन द्यायची पद्धत आहे. आरास, मखर, सजावटीसाठी चर्चा होत राहतात. पाच सहा वर्षापूर्वीपर्यंत सर्रास थर्माकोलची मखरे घरोघरी बनवली जात असत. लहानशा मखरापासून एखाद्या मंदिराची प्रतिकृतीही तयार करीत असत. आता थर्माकोलवर बंदी असल्याने गेल्या चार-पाच वर्षांपासून पुठ्ठ्यांची मखरे बाजारात विक्रीस उपलब्ध होत आहेत. तसेच खर्‍या व कृत्रीम फुलापानांची मखरे, कमानी आणूनही आरास केली जाते. काही काही घरात तर घरच्या बाप्पासमोरही निसर्गाचा देखावा तर कधी सामाजिक संदेश देणारा देखावाही तयार करतात. बाप्पासाठी दागिन्यांची पद्धती आता फारच प्रचलित झाली आहे. पूर्वी एखादा मोत्यांचा हार बाप्पाला घातलेला असे पण आता चांदी सोन्याचे परसू, जास्वंद, मुकूट, कंठा, बाजूबंद, कमळ, अगदी मोदक, दूर्वासुद्धा खरेदी केले जातात आणि बाप्पाला परिधान केले जातात, हा झाले घरातील गणपतींचे. सार्वजनिक गणेशोत्सवांचे तर स्वरूपच वेगळे. काही काही गणेश मंडळे अतीश्रीमंत तिथे तर गणरायाचे वरील दागिने तर सोन्याचे असतातच शिवाय बाप्पाच्या सोंडेवर सोन्याचा अलंकार असतो, बाप्पाचे हात, कान, सुळा, पाऊलेसुद्धा सोन्याची आहेत. मखरेही सोन्यारूप्याची रत्नजडीत आहेत. अशा गणपतीच्या दर्शनालाही मोठी गर्दी उसळलेली दिसून येते. ढोल, ताशाच्या गजरात, लाऊडस्पीकरच्या मोठ्या आवाजात मिरवणूकीने त्याचे आगमन मोठ्या थाटात होत असते.

      यावर्षी मात्र या मिरवणूकींना बंदी आहे ती सोशल डिस्टंस्टींगमुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर. सार्वजनिक गणेश मंडळे सात आठ दिवस आधीच गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना मंडपात करीत असतात आणि नंतर त्याची सजावट केली जाते. त्यामुळे मंडळाच्या गणपतीच्या आगमनाच्या मिरवणूक आधीपासूनच सुरू असते. रोज एक दोन मिरवणूकी तरी दिसतच. आमच्या सोसायटीच्या मागच्या सोसायटीतच मूर्ती बनविण्याचा कारखाना असल्याने तिथून मूर्ती घेऊन जातात. ढोल, ताशांचा गजर सतत कानावर पडत असतो, मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह तर ओसंडून वाहात असतो, मूर्ती ट्रक, टेम्पोमध्ये ठेवतानाची त्यांची धडपड, मूर्तीला धक्का लागू नये सावधगिरी पाहण्यासारखी असते. हे सर्व चालू असताना सतत 'गणपती बाप्पा मोरया' हे सुरूच असते ही घोषणाच जणू प्रत्येकाला ऊर्जा देत असते. आदल्या दिवसापासून घरच्या गणपती बाप्पांच्या मूर्ती नेण्यास वर्दळ सुरू असते. याततर अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळेच उत्साहात सामील असतात. मुली, तरूणी, स्त्रियाही सहभागी असतात. आमच्या इथे एक वेगळाच अनुभव येतो, जेव्हा बाप्पाची मूर्ती कारखान्यातून घरी नेण्यासाठी हातात घेतात तेव्हा तुतारी वाजविली जाते त्यासाठी एक तुतारी वादक तिथे खास गणेश चतुर्थीला असतो.  फटाके, ढोल, ताशे, तुतारी, टाळांच्या गजरात गणपती आपापल्या घरी नेतात. 

      यावर्षीचा बाप्पाच्या आगमनाचा दिवस मात्र याबाबतीत फारच सुना गेला ना ढोल, ताशांचा आवाज ना टाळांचा गजर, ना तुतारीची तान कुठेतरी एखादा 'गणपती बाप्पा मोरया' असा आवाज येई, हे झाले घरच्या बाप्पाचे. सार्वजनिक बाप्पा यावर्षी बसवलेच नाहीत अगदीच कुठेतरी तुरळक. पण घरी आल्यावर मात्र बाप्पाचे नेहमीप्रमाणेच कोडकौतुक होत आहे. विकतच्या मिठाईपेक्षा बाप्पालाही यावेळी प्रत्येक घरात घरातील गृहिणीने निगुतीने केलेल्या पदार्थांचा नैवेद्य मिळत आहे. मोदक, खीर, लाडू अशा अनेक पदार्थांची घराघरांत रेलचेल सुरू आहे. बाप्पालाही यावर्षी २०-२५ वर्षापूर्वीचे दिवस आठवत असतील आणि तीही थोडा सुखावला असेल. 

     दरवर्षी गणेशोत्सव सुरू होण्याआधी पर्यावरणप्रेमींचे गणेश भक्तांना आवाहन असते की गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करा, एक गाव एक गणपती. परंतु याकडे नेहमीच उत्साहाच्या भरात दुर्लक्ष करीत हा उत्सव साजरा केला जात असतो. यावर्षी मात्र खरोखरच पूर्ण नसला तरी बर्‍याच जास्त प्रमाणात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जात आहे, हे या कोरोना महामारीमुळे आलेल्या निर्बंधांचा परिणाम आहे. २५-३०फूटांच्या मूर्ती दरवर्षी बनवल्या जात असत, त्या यावर्षी अगदी ४-५ फूटांवर आल्या आहेत तर यावर्षी बर्‍याच मंडळांनी गणेशोत्सवच साजरा न करण्याचे ठरविले आहे, आगमन आणि विसर्जनावेळीही मिरवणूकीला बंदी घातली असल्यामुळे वायु, आवाजाचे प्रदुषणही होणार नाही. विसर्जन घरच्या घरी करण्याचे आवाहन आणि सार्वजनिक गणपतींची उंची व मूर्तीही कमी असल्याने पाण्याचे प्रदूषणही कमी होईल, ही जरी एक जमेची बाजू असली तरी गणेशोत्सव थोडा उदासच वाटत आहे. 

      कोरोना महामारीमुळे कित्येक घरात आज दुःखाचे सावट आहे, काही घरातील सदस्य या महामारीत बळी पडली आहेत, महामारीमुळे तीन महिन्याच्या टाळेबंदीमुळे कोणाला पगार मिळत नाहीत,  कोणाची नोकरी गेली आहे, व्यवसाय-उद्योगधंद्यात आर्थिक नुकसान तर कोणाचे व्यवसायच धोक्यात आले आहेत. एका भीतीच्या सावटाखाली गेले सहा महिने प्रत्येकजण आयुष्य जगत आहे. ह्या गणेशोत्सवात या विघ्नहर्त्या गजाननाच्या पायी शरण जाऊन एकच मागणे आहे, हे कोरोनाचे विघ्न लवकरात लवकर दूर करीत तुझ्या भक्तांचे दुःख हरण करीत सर्वांना सुखी ठेव...


      तू सुखकर्ता तू दुःखहर्ता विघ्न विनाशक मोरया

      संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया...


बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०

कशी घ्याल आपल्या मानसिक आरोग्याची काळजी?

 

कशी घ्याल आपल्या मानसिक आरोग्याची काळजी?

 

निरोगी शरीर, रोगप्रतिकारक शक्ती , तंदुरुस्त राहा आणि आनंदी राहा असे अनेक सल्ले आपण सध्या ऐकत असतो. पण तरीही ज्या परिस्थिती मधून आपण जात आहोत त्या स्थितीमध्ये या गोष्टी वाटता तितक्या सोप्या नाहीयत हे हि आपण जाणतोच. नैराश्या मध्ये गेलेल्या आणि आत्महत्या केलेल्या किती तरी घटना रोज घडत आहेत. रोगांशी लढण्यासाठी शरीराची तंदुरुस्ती महत्वाची आहेच पण तंदुरुस्त आणि निरोगी राहण्याचा महत्वाचा भाग म्हणजे स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे.

कशी घ्याल मानसिक आरोग्याची काळजी ? मानसिक आरोग्य. नैराश्य , नैराश्य उपाय.  मानसिक तंदुरुस्ती , झोपेचे उपाय . आनंदी कसे राहावे. निरोगी कसे राहावे. निश्चिंत कसे राहावे ? Mental Health. depression. how to be happy? how to be stress free. how to be peaceful. how to take care of mental health?

निरोगी, तंदुरुस्त आणि आनंदी राहण्याचा मुख्य मार्ग आहे आपले मानसिक आरोग्य निरोगी आणि तंदुरुस्त ठेवणे म्हणजे नैराश्याला पळऊन लावण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. आणि हो यासाठी खूप विशेष गोष्टी करण्याची गरज नाहीय आपण फक्त खालील गोष्टींची काळजी घेतलात तर आपले मानसिक आणि त्यामळे साहजिकच शारीरिक आरोग्यही तंदुरुस्त राहील.

 

शक्य तितका जास्त सूर्यप्रकाश मिळवा  

       आता आपण म्हणाल सूर्यप्रकाशाचा आणि मानसिक आरोग्याचा काय संबंध असा प्रश्न आपल्याला पडलाच असेल! तर वाचक मित्रांनो सूर्यप्रकाशाचा खरंच फार महत्वाचा संबंध आहे आपल्या मानसिक आरोग्याशी. वैज्ञानिक दृष्ठ्या सूर्यप्रकाश हा व्हिटामिन D चा स्त्रोत आहे, जे आपल्या शरीरासाठी आणि मेंदूसाठी हि महत्वपूर्ण जीवनसत्व आहे. हे जीवनसत्व आपल्या मेंदू ला अशा रसायनांचा पुरवठा करत जे एन्डोर्फीन  आणि सेरोटोनीन सारख्या मूडमध्ये सुधारणा करते. दिवसातून ३० मी ते २ तास हा कालावधी सूर्यप्रकाशात घालवणे आदर्श असते. जेव्हा टाळेबंदी केली गेली, त्यावेळी घरातून बाहेर पडणे शक्य न्हवते त्यावेळी बऱ्याच व्यक्तींना उदासीन आणि विनाकारण मानसिक ताण जाणवत होता अस बऱ्याच वेळी हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात हि होत, याच कारण असत पुरेसा सूर्यप्रकाश न मिळणे याला सिझनल एफेक्टेद डीसऑर्डर म्हणतात. यासाठी आपल्या मानसिक आरोग्यासाठी सूर्यप्रकाश खूप प्रभावी भूमिका बजावतो.

पुरेशी झोप घ्या

झोप आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी खरोखरच फार महत्वाची असते. झोपेमुळेच मेंदू ला पुरेशी विश्रांती मिळते व शरीरातील सर्व हार्मोन नियंत्रित करण्याचे कार्य अधिक प्रभावी होते. आपल्या भावना आणि आपली मनस्थिती ठरवण्यामध्ये झोप महत्वाची असते, पुरेशी झोप नाही मिळाली तर आपण निराश, चिंताग्रस्त किंवा थकलेले वाटू लागतो, आणि यामुळे विनाकारण चिडचिड होऊन आपले आरोग्य बिघडते. त्यामुळे पुरेशी झोप घ्या.

सकस आहार खा

चांगले खाणे हे फक्त शरीराची शक्ती वाढवते इतकेच नाही तर त्याचा सरळ परिणाम आपल्या मानसिक स्थितीवरही होतो. लोह, कॅल्शिअम आणि व्हिटामिन सी सारखी अत्यंत महत्वाची खनिजे आणि जीवनसत्वे यांची कमतरता आपल्याला मानसिक आरोग्यासाठी हि जबाबदार राहते. तणावग्रस्त किंवा चिंतातूर वाटत असेल तर संतुलित आहार घेण योग्य ठरू शकत.

मद्यपान आणि धृम्रापान टाळा

मद्यपान आणि धृम्रापान या गोष्टी चिंताग्रस्त किंवा तणावात राहणारे व्यक्ती तणाव कमी करण्यासाठी चा उपाय म्हणून करत असल्याचे भासवतात पण याचं गोष्टी खऱ्या अर्थाने तणाव आणि चिंताग्रस्तपणा वाढीस मूळ कारण ठरतात. मद्यपान किंवा धृम्रापान घेऊन तात्पुरते चिंतेपासून आणि तणावातून मुक्त झाल्याचा भास होतो पण ती फक्त एक नशा आहे हे ते लोकं ओळखू शकत नाहीत. त्या नशेचा अमल संपताच ते अधिकच उदास, चिंताग्रस्त आणि तणावाखाली जातात आणि पण एखाद्या गोष्टी वर लक्ष केंद्रित करणे किंवा एकाग्र होणे कठीण होते. यांच्या दीर्घकाळ वापराने शरीरात थायमिन ची कमतरता येते. थायमिन मेंदूच्या कार्यासाठी महत्वाचे आहे, याच्या कमतरते मुळे स्मरणाची समस्या, समन्वयाची समस्या, गोंधळ आणि डोळ्यांचा त्रास उद्भऊ शकतो, यामुळे एकूणच ती व्यक्ती चिडचिडी आणि चिंताग्रस्त बनते.

झोपेच्या आणि इतर गोळ्या डॉक्टरांच्या परवानगी शिवाय खाणे टाळा

अशी औषधे तात्पुरता आराम देतात आणि बऱ्याच वेळा चिंता वाढवतात आणि शारीरिक आणि मानसिक नुकसान करतात. अशा औषधांच्या अधिक वापराने स्कीझोफ्रेनिया सारख्या मानसिक विकृती विकसित करू शकतात.

तणावावर नियंत्रण मिळवा

अनेकदा तणाव टाळता येण शक्य असत, परंतु आपणच तणावाच्या मुख्य करणाला कुरवाळत बसतो आणि तो अधिकच वाढवतो. आपल्याला मानसिक ताण कशामुळे येतो हे जाणून घेणे आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी काय करणे गरजेचं तणावाला समोर कसं जावे याचे नियोजन करण गरजेचं आहे. प्रत्येक समस्सेच निराकरण केव्हा आणि कधी करू शकता याचे वेळापत्रक बनवुन आपल्या जबाबदाऱ्या आणि महत्त्वाचे मुद्दे व्यवस्थापित करा करण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच वेळा आपल्या तणावाची कारणे लिहून ठेवणे यामुळे तणाव व्यवस्थापित करणे आणि तीव्रता कमी करणे सोप होऊ शकत. संकटांपासून दूर पळणे थांबउन त्यांना सामोरे जा आणि समस्यांना तोंड द्या. समस्यांमुळे झोप येण्यामध्ये अडचण होत असेल तर मनपसंद संगीत ऐकून आपण यावर उपाय करता येतो.

दररोज व्यायाम करा

व्यायाम फक्त शरीर चांगले ठेवत नाही तर मानसिक आरोग्य राखण्यामध्ये आणि ताजेतवाने वाटण्यामध्ये हि व्यायामाचा खूप परिणाम होतो. सक्रीय राहण्याने आपण ताजेतवाने तर होताचं पण याच बरोबर मेंदूतील रसायनांना ही उत्तेजना मिळते व आपल्याला चांगल्या मनस्थिती मध्ये ठेवण्यास मदत करते. व्यायामाने जसे शरीर खंबीर होते तसेच मन हि खंबीर होते. व्यायाम नैराश्या, चिंता, ताण थकवा आणि आळशीपणा दूर करण्यास मोठी भूमिका पार पाडते. हाच व्यायाम तंदुरुस्ती आणि दीर्घायुशी देखील बनवतो हे विशेष.

आनंदी राहण्यासाठी आनंद घेत राहा

आपल्याला आवडणाऱ्या, मजेशीर आणि आनंद देणाऱ्या गोष्टी करण्यामध्ये वेळ देण्याचा प्रयत्न करा. फिरायला जाने, गाणी ऐकणे, एखादा विशेष छंद असणे अशा गोष्टींसाठी विशेष वेळ द्यायचा प्रयत्न करा. आपल्याला आवडत्या व्यक्तींशी चर्चा करा, कॉल किंवा मॅसेज वरून संपर्कात राहा. आपल्या अडचणी, चिंता किंवा अगदी दैनंदिन घटनाही शेअर करा. आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत अशा गोष्टी शेअर केल्याने तणाव कमी येण्यामध्ये कमालीचा परिणाम दिसून येतो.

 

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२०

जेईई आणि नीट परीक्षा निर्धारित वेळेतच: सर्वोच्च न्यायालय

जेईई  आणि नीट परीक्षा निर्धारित वेळेतच: सर्वोच्च न्यायालय


जेईई (मुख्य) आणि एनईईटी परीक्षेस स्थगित देण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, चाचणी घेण्यात आणखी विलंब झाल्यास विद्यार्थ्यांचे  मौल्यवान वर्ष वाया जाईल. शेड्यूल केलेली जेईई (मुख्य) परीक्षा १ ते ६ September सप्टेंबर दरम्यान घेण्यात येणार आहे, तर साथीच्या आजारामुळे पूर्ववर्ती एनईईटी-यूजी १३ September सप्टेंबरला होणार आहे.

सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

नात्यांची गरज “संवाद”

 

नात्यांची गरज “संवाद”

जशा प्रेमाच्या व्याख्या व्यक्तीशः बदलतात तसेच नात्यांच्याही बाबतीत आहे. दोन व्यक्तींमधील बंध मग तो कोणताही असुदे प्रियकरांमधील प्रेमाचा, आईवरील प्रेमाचा, आजी आजोबा, बहिण-भाऊ, भाऊ-बाबा किंवा अगदी निखळ मैत्रीचाच बंध, हे बंध म्हणजे मला वाटतं देवानं निर्माण केलेली नाती आणि त्यातला जिव्हाळाच.

natyachi garj. nate kase tikavave. नात्याची गरज . नाते कसे टिकवावे?  संवाद . नातेसंबंध.  प्रेम. communication. love.

या वेगवेगळ्या नात्यांमुळेच खरं म्हणजे आयुष्याला उभारी येते. माणूस पूर्णत्वाकडे जातो आणि समृद्ध होतो. जर उदाहरण सांगायचं झालं तर माझच सांगेन. बहिण हे नातं इतक सुंदर आहे की त्याची तुलना इतर  कुठल्याही नात्याशी होऊ शकत नाही. मला सख्या बहिणी नाहीत परंतु मला माझ्या चारही आते बहिनी सख्या नाहीत असे कधी वाटतच नाही. मी सगळ्यात लहान म्हणजे शेंडफळ, आणि ह्या माझ्या आतेबहिनी, आम्ही एकत्र राहतही नाही पण तरीही आमचे नाते अतूट आहे कारण आमच्या नात्यातील दुवा आहे संवाद .

किती अन काय काय करू शकतो हा संवाद?

दुरावलेली, विखुरलेली, अस्पष्ठ, अबोल नाती आणि अनोळखीही फक्त एका संवादामुळे अखंडपणे जोडली जाऊ शकतात. चार आपुलकीचे, मायेचे आणि काळजीचे शब्द नात्याचा अतूट बंध निर्माण करतात. नाती जपली पाहिजेत, टिकवली पाहिजेत अस फक्त म्हणत बसून नाती टिकत अगर जपली जात नाहीत. त्यासाठी आपला स्वतःचा ५ मीनीट वेळ सुद्धा खूप काही करू शकतो. हा ५ मिनिटांचा संवाद आपल नातं आयुष्यभर तारू शकतो.

एका संवादामुळे माणसाचा मूड कळू शकतो, संवाद हि शब्दांची देवाण घेवाण नसून ती भावनांची देवाण घेवाण आहे. त्यामुळे स्वभाव आचार-विचार आणि एकूणच संपूर्ण व्यक्ती कळून येते. आमची वाचकांना एक विनंती आहे कि आपण स्वतः आठवा की आपण कोणत्या नात्याला वेळ देत नाही आहोत, देऊ शकत नाही आहोत किंवा देणारच नाही आहोत! या महामारीचा काळात टाळेबंदी मुळे एकमेकांची प्रत्यक्ष भेट होणे सहज शक्य राहिलेलं नाहीये, पण यामुळे नाते तुटू न देणे हे आपलेच कर्तव्य असते. कारण नाती आयुष्यभराची, सुखादुखाची सोबती असतात.

जर दुरुवा आलाच असेल, चिडचिड आणि अबोला वाढतच असेल तर ते तुमच नातं तुमचा वेळ मागत आहे. अशा वेळी तुम्ही केवळ त्या तुमच्या नात्याला ५ मीनीट वेळ देऊन बघा. हा ठरवून केलेला संवाद ५ मिनिटे ओलांडून कधी एक तासाचा होऊन जाईल तुम्हालाच कळणार नाही.

चला तर मग या ओढावलेल्या दुराव्यामध्ये संवाद हे एकच माध्यम ठेऊन नाती जपण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करूयात.

धन्यवाद. 

 ©Team E Times Today

अशाच नवनवीन माहिती साठी, लेटेस्ट बातम्यांसाठी वाचत राहा

E Times Today



विचार मंथन , अनुभव , नातेसंबंध, प्रेरणादायी कथा, प्रेरणादायी लेख, मनातील हितगुज, मनातील गप्पा,  Article, blog, 

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशा गोष्टी

 

प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशा गोष्टी

आपल्या भारताबद्दल काही अशा गोष्टी ज्या वाचून प्रत्येक भारतीयाला आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटेल.

Indian. India. Proud India. Love India. Feel India.

आपण सगळे जाणतो कि भारत एक अप्रतिम राष्ट्र आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा आपला देश  इतकेच नाही तर भारत सर्वात प्राचीन संस्कृती सुद्धा आपली  आहे. अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या भारताला एकमेव आणि अप्रतिम देश सिद्ध करतात, या गोष्टींचा आपल्याला नक्कीच अभिमान आहे. चला तर याच फाक्ट्स बद्दल माहिती घेऊ,

 

भारतीय अवकाश संशोधन :

isro. Isro.


        भारतीय अवकाश संशोधन हे जगातील  top ५ अवकाश संशोधक देशांपैकी एक आहे. तसेच पहिल्याच प्रयत्नात मंगल मोहीम यशस्वी करणारा भारत एकमेव देश आहे. 

 

सर्वात मोठी शाळा :

SHALA. school. शाळा


        विद्यार्थी  संख्येनुसार जगातील सर्वात मोठी शाळा ही भारतात आहे,  लखनौ मधील सिटी मोन्तेस्सोरी स्कूल हे त्या शाळेचे नाव असून या शाळेमध्ये ६४हजार विद्यार्थी आहेत.

 

सर्वात मोठा फिल्म निर्माता देश:

फिल्म. प्रोडूसर. film. producer. film producer


        भारत हा जगातील सर्वात मोठा फिल्म निर्माता देश आहे. प्रत्येक वर्षी सर्वात जास्त फिल्म भारतातच प्रसिद्ध होतात.

 

सर्वात मोठा दुग्ध उत्पादक देश:

milk. dudh. milk photo. दुध


         भारत जगातील सर्वात मोठा दुग्ध उत्पादक देश आहे. भारतात म्हैस, गाय या प्राण्यांपासून दुध मिळवले जाते.

 

सर्वात मोठे रस्तेवाहतुकीचे जाळे :


        भारतात सर्वात मोठे रस्ते वाहतुकीचे जाळे आहे, हे रस्ते वाहतुकीचे जाळे  1.9 मिल्लिअन मैल इतके प्रचंड आहे.

 

मार्शल आर्ट, बुद्धिबळ आणि इतर खेळ  :


मार्शल आर्ट ची निर्मिती भारतामध्ये झालेली आहे, तसेच बुद्धिबळ, खो-खो  आणि इतरही   बरेच खेळ आहेत ज्यांची सुरुवात भारतात फार प्राचीन काळापासून झाली आहे.

 

स्वीजरर्लंड चा राष्ट्रीय विज्ञान दिवस :


         हे वाचून नक्कीच अभिमान वाटेल कि स्वीजरर्लंड चा राष्ट्रीय विज्ञान दिवस हा २६ मे  आहे , आणि हा दिवस  Dr, A P J Abdul Kalam  सर यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आल आहे. कलाम सर यांनी २६ मे रोजी स्वीजरर्लंड ला पहिली भेट दिली होती.

सर्वप्रथम  चंद्रावर पाणी भारताने शोधले :


         पृथ्वीचा एकमेव उपग्रह असलेल्या चंद्रावर सर्व प्रथम पाणी असल्यानचा महत्वपूर्ण शोध आणि पुरावे भारताने प्रसिद्ध केले आहेत.

 

शाम्पू चा शोध :


        केसांच्या आरोग्यासाठी हल्ली शाम्पू चा वापर खूप होतो, देशविदेशी खूप कंपन्या शाम्पू बनवतात पण सर्वात प्रथम शाम्पू चा शोध आणि वापर भारतामध्ये झालेला आहे.

 

कुंभमेळा :


        भारतातील कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा असतो, याचा अंदाज आपल्याला यावरून येईल कि कुंभमेळा आकाशामधूनही पाहता येतो.

शांतताप्रीय देश:


        होय आपल्या भारत देशास जगभरात शांतता प्रिय देश म्हणून ओळ्खल जात, याच कारणही तसच आहे. भारत देशाने कधीही स्वतःहून कोणत्या देशावर आक्रमण केलेलं नाहीय.



© Team E Times

अशाच नवनवीन माहिती साठी, लेटेस्ट बातम्यांसाठी वाचत राहा

E Times Today

 

 

अभिमानास्पद , भारतीय, भारतीय गोष्टी, top भारतीय फाक्ट्स , भारतीयांचा अभिमान , Proud to be an Indian, India The Great Nation, The Great India, The Great Nation, Best Nation, India, Facts we should be Proud as an Indians, Proud Indians .