बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०

"कोरोना आणि ऑक्सिमीटर"

"कोरोना आणि ऑक्सिमीटर" 
एव्हाना बऱ्याच लोकांपर्यत कोरोनाची लागण झाल्यास या रोगाची तीव्रता जोखण्यासाठी पल्स ऑक्सिमीटर हे उपकरण कामी येऊ शकतं ही माहिती पोहोचली आहे. "पल्स ऑक्सिमीटर वापरा आणि अमुक एक रिडींग असेल तर घाबरायची गरज नाही" असं नुसतंच सांगण्यापेक्षा या मशीनच्या सदंर्भातले लोकांच्या मनातले बेसिक प्रश्न सोडवले,शास्त्रीय दुष्टीकोनातून शक्य होईल तितक्या सोप्या भाषेत जर या मागचं विज्ञान उलगडून दाखवता आलं, तर नक्कीच या उपकरणाची उपयुक्तता जास्तं लोकांना समजेल आणि एका छोट्याश्या उपकरणामुळे या रोगाला न घाबरता आपण योग्य नियम पाळून, वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन, घाबरून न जाता आपल्या घरामध्ये राहून, योग्य वैद्यकीय उपचार घेऊन कोरोनाला घालवू शकतो हा विश्वास निर्माण होईल.. यासाठी हा लेख. 

पल्स ऑक्सिमीटर म्हणजे एक छोटंसं मशीन जे आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी दाखवतं. हे इतकुसं मशीन कसं काय बुवा आपली मदत करतं? कोणतीही सुई न टोचता, फक्त या मशीनमध्ये बोट अडकवलं तर याला कसं कळतं आपल्या शरीरातल्या ऑक्सिजनचं प्रमाण? यामागचं शास्त्रीय कारण काय आहे? आपल्या शरीरातल्या ऑक्सिजनचं प्रमाण अमुक इतकं असणं का गरजेचं असतं?  शरीरातील ऑक्सिजनची पातळी आणि कोरोनाचा काय संबंध आहे? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडू शकतात. बायोमेडिकल इंजिनिअरींग शिकताना   विज्ञान आणि टेक्नॉलॉजीची यांची  सांगड घालून उपकरणं कशी बनवली जातात आणि फिजिओलॉजी शिकताना ही उपकरणं जे रिझल्ट देतात त्यांचा संबंध शरीरात काय बिघाड झाला आहे याच्याशी कसा लावायचा याचा अभ्यास केला आहे. 

कोरोनाचा आणि  शरीरातील ऑक्सिजन कमी होण्याचा संबंध आहे तरी  काय?

कोरोनाची लागणं झाल्यावर रुग्णाच्या  शरीरातलं ऑक्सिजनचं प्रमाण हे या आजाराची  तीव्रता किती आहे याचं एक इंडिकेटर आहे. या रोगाशी प्रतिकार करण्यास जेव्हा रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी पडते तेव्हा, हा विषाणू अधिक फोफावत जातो.  ज्या लोकांमध्ये  ब्लड प्रेशर, डायेबेटीस,हृदयाचे विकार, श्वसनाचे विकार, वय जास्तं असल्याने क्षीण झालेली प्रतिकारशक्ती ही अंडरलाईंग कारणं असतात,  अशा लोकांमध्ये कोरोना झाल्यावर ARDS म्हणजे ‘अक्यूट रेस्पायरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम’ होण्याची शक्यता जास्तं असते. अशा वेळी श्वास घ्यायला त्रास होणं,कोरडा  खोकला  येणं, हृदयाची धडधड वाढणं ही लक्षणं दिसून येतात. कोरोना व्हायरस रुग्णाच्या फुफ्फुसांवर परिणाम करतो आणि फुफ्फुसामधल्या छोट्या छोट्या हवेच्या पिशव्या असतात, ज्यांना ‘अलव्हिओलाय’ म्हणतात, त्यांना डॅमेज करतो. हे आलव्हिओलाय फुफुसातून ब्लड कॅपीलरीजमार्फत   (रक्त्त केशिका) ऑक्सिजन RBC म्हणजे लाल रक्त पेशींना पुरवतो. या पेशी पुढे ऑक्सिजन शरीरातील अवयवांपर्यंत पोहोचवतात. म्हणून हायपॉक्सिया (म्हणजे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे) हा अत्यंत महत्वाचा इंडिकेटर आहे.  कोरोनाची तीव्रता, रुग्णाला त्वरित इस्पितळात दाखल करण्याची गरज आहे की नाही.. या बाबी म्हणून शरीरातल्या ऑक्सिजनच्या पातळीवर अवलंबून आहेत आणि इथे पल्स ऑक्सिमीटर हे छोटंसं उपकरणं कामी येऊ शकतं.   

पल्स ऑक्सिमीटर वापरायचं कसं ?

आपल्या शरीरातील आक्सिजनची मात्रा मोजण्यासाठी पल्स ऑक्सिमीटचा वापर केला जातो.  ऑक्सिमीटरमध्ये  बोट ठेवून काही सेकंदात  त्याच्या स्क्रीनवर आपल्याला शरीरातल्या ऑक्सिजनचं प्रमाण दिसतं. बोटाला कोणत्याही प्रकारची इजा अथवा वेदना यामध्ये होत नाही. डॉक्टर रिचर्ड लेवीटन यांनी पल्स ऑक्सिमीटर, कोरोनाची गंभीरता जोखण्यासाठी कसं उपयुक्त आहे याबात न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक लेख लिहिला होता. इमर्जन्सी मेडिसिनमध्ये गेली तीस वर्ष काम करणारे डॉक्टर रिचर्ड लेवीटन यांनी या लेखात म्हटल्याप्रमाणे निरोगी लोकांमध्ये पल्स ऑक्सिमीटर चे रिडींग हे ९५ ते ९८ टक्के असं असतं. जर रुग्णाच्या शरीरातलं ऑक्सिजनचं प्रमाण 92 -94 टक्क्यांच्या खाली असेल तर डॉक्टरांशी बोलून, रुग्णाला मग इस्पितळात भरती करण्याची गरज आहे की नाही हे ठरवावं. जो पर्यंत शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण हे ९५ च्या वर आहे, श्वास घेण्यास विशेष अडचण नसेल तर कोरोना योग्य वैद्यकीय उपचारांनी घरच्या घरी बरा होऊ शकतो 

👉पल्स ऑक्सिमीटर बोटाला कोणतीही सुई न टोचता कसं काम करतं?

पल्स ऑक्सिमीटरमध्ये नुसतं एक बोट ठेवून, कोणतीही सुई शरीरात न जाता, हे उपकरण कसं काय आपल्या शरीरातल्या ऑक्सिजनचं प्रमाण मोजतं  हे आपण आता पाहूया. इलेकट्रोनिक प्रोसेसर असलेल्या या  ऑक्सिमीटरमध्ये जेव्हा आपण आपलं बोट  ठेवतो, तेव्हा दोन एल ई डी  डायोड्स आणि फोटोडायोड च्या मार्फत  रेड आणि निअर इन्फ्रारेड असे दोन प्रकारचे प्रकाश किरणं आपल्या बोटावर पडतात.  आपल्या शरीरातील ऑक्सिजनेटेड हिमोग्लोबीन (जे ऑक्सिजन वाहून नेतं) हे ९४० नॅनोमीटर वेव्हलेंथवर ( तरंगलांबी) इन्फ्रा रेड लाईट एबझॉर्ब करतं ( शोषून घेतं) आणि डीऑक्सिजनटेड हिमोग्लोबिन हे ६६० नॅनोमीटर वेव्हलेंथवर रेड लाईट एबझॉर्ब करतं. काही सेकंदासाठी ही सायकल सुरु राहते. यानंतर किती प्रकाश प्रसारित झाला (ट्रांसमिटेड लाईट) मोजल्या जातो. करेक्शन फॅक्टर लावून मग ऑक्सिजनेटेड आणि डीऑक्सिजनटेड हिमोग्लोबिनचा एक रेशिओ काढल्या जातो. प्रोसेसरच्या साहायाने ( बिअर- लॅम्बर्ट लावून ) SpO२ (सॅच्युरेटेड ऑक्सिजन) चं प्रमाण काढल्या जातं,जे आपल्याला ऑक्सिमीटरच्या डिस्प्ले पॅनलवर दिसतं. 

👉पल्स ऑक्सिमीटरवर आलेलं रिडींग आणि कोरोनाची लागण यांचा काय संबंध आहे?

सो हा जो काही आकडा ऑक्सिमीटरच्या डिस्प्ले पॅनलवर आपल्याला पाहायला मिळतो तो आकडा म्हणजे आपल्या शरीरातील सॅच्युरेटेड ऑक्सिजनचं प्रमाण असतं. समजा ऑक्सिमीटरच्या डिस्प्ले पॅनलवर ९७ टक्के असं रिडींग आलं याचा ढोबळ अर्थ असा तुमच्या शरीरात ९७ टक्के होमोग्लोबीन हे ऑक्सिजन वाहून नेतं आहे.  जेव्हा कोरोनाचा संसर्ग होतो आणि आपली प्रतिकारशक्ती त्याचा सामना करू शकत नाही, तेव्हा हा आजार बळावतो आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे फुफ्फुसांवर हल्ला करतो ज्यामुळे ऑक्सिजनेटेड हिमोग्लोबिनची मात्रा कमी होते आणि आपल्याला SpO२ म्हणजेच ऑक्सिमीटरवर दिसणारं रिडींग कमी होत जातं आणि म्हणून कोरोना झालेल्या व्यक्तीने पल्स ऑक्सिमीटर वापरणं, दिवसांतून विशिष्ट वेळा ठरवून रिडींग घेणं, एका रीडिंगवर निर्णय न घेता, रीडिंगचा पॅटर्न बघणं आणि तो सतत कमी असेल तर आपल्या डॉक्टरशी चर्चा करून इस्पितळात भरती होणं हे अत्यंत गरजेचं आहे.

👉कोणतं ऑक्सिमीटर विकत घ्यावं?

जे लोक हाय रिस्क ग्रुपमध्ये नाहीयेत त्यांना रोज ऑक्सिमीटरच्या  चाचणी गरज नाही. तसंच कोरोनाची लक्षणं जाणवली तरचं ऑक्सिमीटर वापरणं इष्ट.  प्रत्येकाला  ऑक्सिमीटर विकत घेणं परवडणारं नसेल तर सोसायटीमध्ये एक असं घेता येऊ शकतं. इथे कोणताही एक असा ब्रँड मी नमूद करत नाहीये कारण तो या लेखाचा मुद्दा नाहीये. साधारण कंपनीचं नाव, सगळे डिटेल्स नीट छापलेले असतील, एखादं सर्टिफिकेशन असेल असं उपकरण घेणं हिताचं. आपल्या नेहेमीच्या औषध विक्रेत्याला विचारून सुद्धा रिलाएबल ब्रँड आपण घेऊ शकता.  

आॅक्सिजन मोजण्यासाठी  मोबाईल वरचे ऍप्स वापरावे का? 

अजून एक महत्वाची गोष्ट ही मोबाईलवर सुद्धा ऑक्सिजन मोजण्याचे ऍप्स आहेत पण खूप सारे रिसर्चर्स, डॉक्टर्सच्या म्हणण्यानुसार या ऍप्सची अचूक मोजमाप करण्याची  विश्वसार्ह्यता कमी आहे. तसंच सध्या ऑक्सिमीटरच्या काही फसव्या लिंक्स सुद्धा पसरवल्या जात आहेत हे ऍप्स आपण डाउनलोड केले आणि ऑक्सिजन चेक करण्यासाठी आपलं बोट सेन्सरला लावलं की आपले फिंगरप्रिंट डिटेल्स आणि पर्सनल डेटा आणि बँक अकाउंट डिटेल्स वगैरे चोरीला जाण्याची शक्यता आहे. हा एक प्रकारचा सायबर क्राईम आहे त्यामुळे विश्वासार्ह्यता पडताळल्याशिवाय या पद्धतीचे कोणतेही एप  डाउनलोड करणं शक्यतो टाळा   मी जो सिद्धांत सांगितला आहे तो नीट वाचल्यास तुमच्या लक्षात येईल की या उपकरणामध्ये डायोड्सची क्वालिटी उत्तम असणं हे अचूक रिझल्टसाठी अत्यंत आवश्यक आहे म्हणून शक्यतो चांगलं उपकरण वापरणं हे अधिक योग्य ठरेल. आपण  रिडींग घेतल्यावर घरातल्या इतर लोकांचं देखील रिडींग घेणं आणि त्यानुसार उपकरण कॅलीब्रेट करणं हे सुद्धा गरजेचं आहे. आपण जे उपकरण वापरतो आहोत ते योग्य आणि अचूक रिडींग दाखवतं आहे हे पडताळून बघत राहणं महत्वाचं!  

6MWT-  सिक्स मिनिट वॉक टेस्ट

हाय रिस्क ग्रुपमध्ये किंवा ज्यांच्या मध्ये  कोरोनाचं निदान झालं आहे आणि ऑक्सिजन लेव्हल ९४ टक्क्यांच्या खाली असेल अशा लोकांकरिता  6MWT म्हणजेच सिक्स मिनिट वॉक टेस्ट’ सुचवली जात आहे. कधी कधी कोरोनाचे कोणतेही लक्षण नसताना सुद्धा लोक कारण नसताना ऑक्सिमीटर वापरतात आणि अचानक एखाद्या वेळी रिडींग कमी आलं की घाबरून जातात. अशा वेळी सुद्धा ही चाचणी घरच्या घरी  करून बघता येऊ शकते. टेस्ट सोपी आहे.  चालायच्या आधी एकदा ऑक्सिमीटरवर रिडींग घेणे. मग सहा मिनिटांकरिता नॉर्मल गतीने चालणे. हृदयरोगाचा त्रास असेल आणि चालताना खूप धडधड वाढली  अथवा श्वास घेताना त्रास होत असेल तर हे लगेच थांबवावे. सहा मिनिटे चालल्यावर मग पुन्हा रिडींग घेऊन पाहावे. जर खूपच थकवा जाणवला आणि रिडींग ३ टक्क्याने खाली गेलं तर मात्र मग आपल्या डॉक्टरशी संपर्क साधावा.  “द लॅन्सेट” या मेडिकल जर्नलमध्ये कोरोनामुळे ऑक्सिजनची मात्रा कमी झालेल्या पेशन्ट्सना प्रोन पोझिशन म्हणजेच पोटावर झोपवल्यास त्यांच्या ऑक्सिजन पातळीमध्ये वाढ झाल्याचं  दिसून आलं आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये पॅनिक न होता, घाबरून न जाता आपल्या डॉक्टरशी नीट बोलत राहिल्यास, प्रशासनाला कळवल्यास आणि योग्य वैद्यकीय उपचार घेतल्यास, हातपाय न गाळता सतर्क राहिल्यास आणि अंतर – पथ्याचे ( सोशल डिस्टंसिंग) सर्व नियम योग्य पद्धतीने पाळल्यास कोरोना पासून आपला बचाव होऊ शकतो.
: *श्वास नलिका* आणि *अन्न नलिका* ह्या दोन वेगळ्या आहेत.  आपण जर नेहमी गरम पाणी पिऊन घश्याची, अन्ननलिकेची सुरक्षा बघत असाल तर खूपच चांगलं आहे, व ती होतही असते.  पण श्वसन मार्गाचे काय ?  अजून एक पॅरानेझल सायनस म्हणून नाकाच्या पाठीमागेएक हाड असते, त्याच्या मागे एक पोकळी असते, त्या पोकळीमध्ये संसर्गाचे जंतू जाऊन बसतात. तिथे एक प्रकारचं लॉकिंग मेकॅनिझम असते त्यामुळे बाहेरील जंतू जाऊन प्राथमिकतः तिथे अडकतात.  परंतु तिथून ते चार दिवसांनी ते फुप्पुसांपर्यंत पोहोचतात.  सुरवातीला तिथल्या जंतूंच्या वास्तव्यामुळे तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत नाही, परंतु तिथून ते चार दिवसांनी ते फुप्पुसां पर्यंत पोहोचतात.  आणि नंतर श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो.  जर त्या जंतूंना पॅरानेझल सायनस मध्येच मारायचं असेल तर स्टीम घेणे अती आवश्यक.  आपण जे गरम पाणी पितो ते तेथपर्यंत पोहोचू शकत नाही. 
साधारणपणे ४० डिग्री सेन्टीग्रेड ची वाफ हि त्या व्हायरसला पांगळा करते. ६० डिग्री सेन्टीग्रेडची वाफ ही व्हायरस ला पांगळी करते, आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती त्याला मारू शकते. ७० डिग्री सेन्टीग्रेडची वाफ हि व्हायरसला पूर्ण पणे मारते.  संपूर्ण चीन, जपान, हॉंगकॉंग, हा स्टीम वर आहे. 
श्वास नलिकेतून संसर्ग थेट फुप्पुसांपर्यंत पोहचतो, म्हणून स्टीम घेणे कायम फायदेशीर आहे. 
आता ती कशी घ्यायची ?  जर घरातच असाल तर एकदा वाफ घ्यायची.  जर तुम्ही भाजी किंवा काहीही खरेदी करायला बाहेर जात असाल तर दोनदा वाफ घ्यायची.  जर तुम्ही लोकांना ऑफिस मध्ये भेटत असाल तर तीनदा घ्यायची.  जर कोण थेट कोविड रुग्णाची काळजी घेत असेल संपर्कात असेल तर दर दोन तासांनी वाफ घेणे अती आवश्यक आहे.  तर आता आपणच आपली काळजी घ्यायची आहे. 
म्हणजेच गरम पाणी पिणे, नियमित वाफ घेणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढेल असं जेवण जेवणे, मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे ह्या गोष्टी काटेकोर पणे पाळलात तर आपण सुरक्षित राहाल.
कृपया वाचा आणि आपल्या ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा.
Source : Unknown (WhatsApp)
Validated by : Dr. Pramod Kasabe