Top news in INDIA, Latest news: Read Latest news, Entertainment, Blogs, Health Tips, Health News. E Times Today provides the latest news today from all over india, Maharashtra. E Times also Provides exclusive top stories of the day, today headlines from politics, health, Sport, Business, Art, Corona, technology, science, medical...etc. latest news in India, top news in Maharastra, top Marathi News,
बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०
"कोरोना आणि ऑक्सिमीटर"
सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०
मुलांना आजी आजोबा हवेत
मुलांना आजी आजोबा हवेत
मानवी भाव-भावनांच्या भक्कम पायावर उभे असलेले व तेव्हढेच प्रेमळ तसेच मायाळू
असलेले नाते म्हणजे आजी-आजोबा आणि नातवंडातील शब्दापलीकडील नाते. कोणत्याही नात्याला हेवा वाटेल असे हे
आजी-आजोबा व नातवंडे यांचे नाते. या नात्याला दुधावरच्या सायीची उपमा दिल्यामुळे या
नात्यातील गहिरेपणा अधिकच प्रकर्षाने जाणवितो. या
नात्याकडे सहज, सुंदर व संपन्न नाते तसेच निर्व्याज प्रेमळ
नाते म्हणून पाहिले जाते. हे एक आपुलकीचे व जिव्हाळ्याचे नाते आहे. मुलगा किंवा मुलगी कितीही प्रेमाची तशीच मायेची असतील तरी त्यांच्या
मुलांवरचे प्रेम नेहमीच दोन अंगुळे जास्त असतेच व म्हणूनच ते शब्दांत कधीच व्यक्त करता येणार नाही.
आजी-आजोबांच्या मनातील एक कप्पा हा नेहमीच नातवंडानी व्यापलेला
असतो. नातवंडांच्या नुसत्या आठवणीने आजी-आजोबा हळवे
होतात. एकदा नातवंडे झाली की आजी-आजोबा यांचा
मुलां-मुलींपेक्षा नातवंडांकडे ओढा जास्त असतो. नातवंडे
प्रेमाने कुशीत शिरली की ते जे समाधान आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर दिसते त्याचे
वर्णनच करूच शकत नाही. या नात्याला लडिवाळ नाते म्हटले तर जास्त संयुक्तिक ठरेल. आपल्या नातवंडांच्या रूपात ते आपल्या
मुलींचे / मुलांचे बालपण तसेच त्यांची मोठे होण्याची प्रक्रिया या गोष्टींचा ते पुन्हा एकदा अनुभव घेत असतात. काबाडकष्ट करून वाढवलेल्या वृक्षावर
येणारी नातवंडरूपातील फळे पहाण्यास
तसेच त्यांना स्पर्श करण्यास आजी-आजोबा आसुसलेले असतात. आजी-आजोबा लवकर इकडे या असे अधिकारवाणीने सांगणारी नातवंडे असतात.
सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की हे
ऐकल्यावर आजी-आजोबा धावत पळत येतात. तसेच
तुम्हाला काहीच कसे कळत नाही हे सांगणारी सुद्धा नातवंडे असतात व त्यात
आजी-आजोबांना काहीच वाटत नाही व ते हसण्यावारी नेतात.
एक कबूल करावेच लागेल की मुलांना आजी-आजोबा हवेतच. नातवंडांनाही ते शिक्षित आहेत का
अशिक्षित याचा काही फरक पडत नाही. नकळतपणे नातवंडेही
एक मानसिक आधार म्हणून आजी-आजोबांकडे पहात असतात. आई-वडिलांपेक्षा
मुले आजी-आजोबांकडे नकळतपणे ओढली जातात. मुलांना
आई-वडिलांकडून प्रेम तर मिळतच असते पण आजी-आजोबांचे प्रेम ही एक वेगळीच गोष्ट आहे.
आजी-आजोबांनाही एक प्रकारची अशब्द आपुलकी असते.
कधी कधी घरात चेष्टा मस्करीत थोडे मतभेद झाले तर आई-बाबा
एकाबाजूला व आजी-आजोबांबरोबर नातवंडे असा विरुद्ध पक्ष तयार होतो. आई-बाबा रागावले की मुले आजीच्या पदराआड लपतात. आजी त्या मुलांना दोन गोष्टी समजावून सांगते. आई
का रागावली हे नातवंडांकडून
ऐकून घेतांना तुझे कुठे चुकले हेही गोडी-गुलाबीने
समजावून सांगते. अशा वेळेस नातवंडांना आजीचा आधार फार
भक्कम वाटतो. आजी-आजोबांच्या मनात नातवंडांसाठी हळवा
कोपरा तर असतोच पण प्रसंगी कठोर होऊन नातवंडांना त्यांची चूकही दाखवून देतात व पुन्हा अशी चूक होणार नाही याची ग्वाहीही नातवंडांकडून
घेतात. आजी-आजोबांच्या भूमिकेत शिरले की नकळतच
नातवंडांसाठी मनातील एक भाग राखून ठेवला जातो.
मुलांचे आजी-आजोबांबरोबरचे नाते नैसर्गिकरित्या उमलत जाते. आजी-आजोबांमुळे
भाषेची ओळख होणे खूप सोपे जाते. आजीला खूप ओव्या,
अभंग, श्लोक, वेचे इत्यादी तोंडपाठ असतात व नातवंडांना समोर बसवून आजी आपल्या आवाजात म्हणून दाखवत असते. कालांतराने ऐकून ऐकून नातवंड नकळतपणे आजीबरोबर म्हणू लागतात. त्यातील एखादा शब्द अडला
तर आजी न रागावता नातवंडांना समजावून सांगते. त्यामुळे नवीन नवीन शब्द कानावर पडल्यामुळे साहजिकच शब्दसंग्रह वाढतो. आजी जेव्हा काही समजावून सांगत असते
तेव्हा त्या शब्दांचा अचूक उच्चारही आजीच्या तोंडून कानावर पडतो त्यामुळे वेगवेगळ्या शब्दांचा तंतोतंत उच्चार
कसा करायचा याचे धडे नकळत आजी नातवंडांना देत असते. या
आपोआप घोकलेल्या उच्चारांमुळे पुढील
आयुष्यात त्या उच्चारांचा फायदाच होतो. एका बाजूला आजी
निरनिराळ्या ओव्या, अभंग, श्लोक,
वेचे इत्यादी या योगे नातवंडांना
शब्दांची ओळख, शब्दसंग्रह तसेच अचूक उच्चार याचे नकळत धडे
देत असते. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आजोबा
निरनिराळ्या गोष्टी सांगून नातवंडांचे मन तर रिझवीत
असतातच पण त्याचबरोबर त्यांच्या सामान्य ज्ञानात भरही टाकीत असतात.
त्यात गोष्टीरूप रामायण, महाभारतातील कथा असतात, पंचतंत्रातील कथा असतात,
व्यवहारी जगातील काल्पनिक कथा असतात, बालकथाही
असतात अशा कित्येक प्रकारच्या कथांचा खजिना आजोबा आपल्या नातवंडांसमोर रिता करीत
असतात. कधी कधी त्यात परीकथाही असतात. जसजसे वय वाढते तसे परीकथांचे प्रमाण कमी होत
जाते. आजी-आजोबांच्या कृतीतून नातवंडांना फायदाच होत
असतो. सामान्य ज्ञानात भर तर
पडतेच पण त्याचबरोबर शब्दोच्चार अचूक या अस्खलित
करण्यासाठी प्रयत्न करण्याची सवय लागते.
तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्व गोष्टींमुळे
संस्कार विकसित होण्यास मदत होते. हा जन्मभरीचा ठेवा नातवंडांना आजी-आजोबांकडूनच
मिळतो. पतंग उडविताना फिरकी धरायला आजोबाच लागतात तसेच
पावसाळ्यात साठलेल्या पाण्यात होड्या सोडण्यासाठी होड्या बनवून द्यायला आजोबाच
लागतात. तसेच शाळा शाळा खेळतांना आजी-आजोबाच विद्यार्थी म्हणून लागतात.
शाळा शाळा खेळतांना नातवंडांच्या हातून फूटपट्टीचा हलकासा मार खावा
लागतो पण आजी-आजोबा ते आनंदाने सहन करतात.
नातवंडांना आजी-आजोबा इतके जवळचे वाटतात की मनातील काही गुपिते ते
त्यांच्यासमोर उघड करण्यात तत्पर असतात. आपल्याला
आपले आजी-आजोबा नक्कीच मदत करतील याची त्यांना खात्री असते. वयाच्या एका विशिष्ठ टप्प्यावर काही गोष्टी आई-वडिलांना सरळ सांगणे त्यांना
कठीण जात असते अथवा त्यांची मानसिक तयारी होत नसते अशावेळेस ते प्रथम आजी-आजोबांना
त्या गोष्टी सांगतात. त्यांना खात्री असते की अचूक
मार्गदर्शन अथवा अचूक सल्ला मिळण्याची जागा म्हणजे आजी-आजोबा. त्यांना ही खात्री असते की आपण जर बरोबर असलो तर
नक्कीच आजी-आजोबा आई-बाबांबरोबर त्या विषयी बोलतील. नातवंडांचे
जर बरोबर असेल तर आपल्या जीवनातील अनुभवाच्या आधारे ते आई-वडिलांना समजविण्याचा प्रयत्न करतील, त्यांना
मार्गदर्शन करतील असा विश्वास नातवंडांना असतो.
आपल्या मुलांना आलेल्या समस्या, आलेले प्रश्न आपल्या नातवंडांच्या वाट्याला येऊ नयेत याबद्दल ते सजग असतात.
आपल्या मुलाला जे मिळाले नाही अथवा आपण देऊ शकलो नाही त्या गोष्टी
नातवंडांना मिळाव्यात याबद्दल ते प्रयत्नशील असतात.
एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजी-आजोबांची भूमिका म्हणजे सोपी गोष्ट नसावी. मुलांना वाढवतांना त्यांनी कडक
शिस्तीचे धडे दिलेले असतात. त्यांचे लाड करतांना
त्याचे फाजील लाड होणार नाहीत याची काळजी घेतलेली असते. मुले बिघडू नयेत म्हणून व्यवस्थित वळण लावलेले असते. त्यांच्या शिक्षणाकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिले जाते. त्यांच्या वागण्यावर बारकाईने लक्ष दिले होते. कालांतराने ते आजी-आजोबांच्या भूमिकेत शिरतात. नातवंडांचे आई-वडील दोघेही नोकरी करणारे असतील तर त्यांची वेगळी भूमिका
असते. दोघेही नोकरीसाठी बाहेर पडल्यावर नातवंडांचे संगोपन ही त्याची प्रमुख तसेच महत्त्वाची भूमिका ठरते.
त्याचे लाड करतांना ते अवाजवी होणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे
असते. नातवंडे ही तिसरी पिढी असल्यामुळे साहजिकच
विचारसरणीतही फरक पडू शकते. तसेच दिनचर्येतही
काळाप्रमाणे बदल झालेला असतो व तो बदल अंगीकारणे आजी-आजोबांना जाड जाते. शिक्षण
पद्धतीत बदल झालेला असतो. या परिस्थितीला देणे हे आजी-आजोबांना नक्कीच जड जात असेल. शिक्षणपद्धतीतही आमूलाग्र
बदल झालेला असल्यामुळे त्या पद्धतीशी जुळवून घेणे नक्कीच कठीण जात असेल.
त्याचबरोबर आजी-आजोबांचा असाही विचार असू शकतो की नोकरी तसेच इतर
काही कारणांमुळे आम्हाला मुलांना वाढतांना मनसोक्त पहाता आले नाही अथवा मुलांना
वाढवताना आमच्या हातून काही चुका झाल्या असतील हा विचार करून
नातवंडांच्या सर्वंकष प्रगतीकरिता मनापासून प्रयत्न केले जातात. त्यांना वाढतांना पाहून एक वेगळाच आनंद आजी-आजोबांना मिळत असतो व
त्यांच्या आनंदात आपला आनंद शोधण्याची सवयच लागते. नातवंडांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर आई-बाबा जरी नोकरीसाठी बाहेर पडत
असले तरी आजी-आजोबा जवळ असल्यामुळे एकटेपणा जाणवत नाही. तसेच कुटुंब संस्कारांची ओळख तर होतेच पण त्याचबरोबर इतर नातेवाईकांशी
संपर्कही साधला जातो. आजी-आजोबांशी गप्पा मारतांना
नातवंडांना आपल्या कुटुंब पद्धतीची तसेच कौटुंबिक नातलगांशी माहिती करून घेता
येते. त्यांना असे वाटत असावे की आई-बाबांपेक्षा
आजी-आजोबा आपले म्हणणे / समस्या शांतपणे ऐकून घेतात त्यामुळे साहजिकच
आजी-आजोबांकडे त्या मुलांचा ओढा वाढतो. पण हे ही
विचार करण्यासारखे आहे की नोकरी करणाऱ्या आई-बाबांना
घराबरोबरच बाहेरील / कार्यालयातील ताण-तणावांनाही तोंड द्यायचे असते.
शेवटी असे म्हणता येईल की आजी-आजोबा यांच्या खेळकर नात्यामुळे घरातील वातावरण
हलके फुलके राहण्यास मदत होते. या नात्याचे वर्णन इंग्रजीत करतांना 'ग्रँड' हा समर्पक व रुबाबदार उपसर्ग जोडला जातो. ग्रँडफादर / ग्रॅण्डमदर हे शब्द
नेहमीच आदराने घेतले जातात .
सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०
तू दुःखहर्ता
शनिवार, २२ ऑगस्ट, २०२०
श्री गणेशाची 108 नावे
श्री गणेशाची 108 नावे
श्रीगणेशाची हजारो नावे प्राचीन काळापासून प्रचलित आहेत त्या सर्व नावांचे वाचन शक्य नाही पण गणेश भक्त मंडळी त्यांच्या आवडीनुसार या 108 नावांचे पठण करू शकतात. म्हणून आज घेऊन येत आहोत श्रीगणेशाची ही 108 नावे. श्री गणेशाची 108 नावे, ज्यांचे नामस्मरण देतात यश कीर्ती आणि पराक्रम.
श्री गणेशाची 108 नावे
108 Names of Lord Ganesha
1) बालगणपति :- Baalganapati
2) भालचन्द्र :- Bhalchandra
3) बुद्धिनाथ :- Buddhinath
4) धूम्रवर्ण :- Dhumravarna
5) एकाक्षर :- Ekakshar
6) एकदंत :- Ekdant
7) गजकर्ण :- Gajkarn
8) गजानन :- Gajaanan
9) गजनान :-Gajnaan
10) गजवक्र :- Gajvakra
11) गजवक्त्र :- Gajvaktra
12) गणाध्यक्ष :- Ganaadhyaksha
13) गणपति :- Ganapati
14) गौरीसुत :- Gaurisut
15) लंबकर्ण :- Lambakarn
16) लंबोदर :- Lambodar
17) महाबल :- Mahaabal
18) महागणपति :- Mahaaganapati
19) महेश्वर :- Maheshwar
20) मंगलमूर्ति :- Mangalmurti
21) मूषकवाहन :- Mushakvaahan
22) निदीश्वरम :- Nidishwaram
23) प्रथमेश्वर :- Prathameshwar
24) शूपकर्ण :- Shoopkarna
25) शुभम :- Shubham
26) सिद्धिदाता :- Siddhidata
27) सिद्धिविनायक :- Siddhivinaayak
28) सुरेश्वरम :- Sureshvaram
29) वक्रतुंड :- Vakratund
30) अखूरथ :- Akhurath
31) अलंपत :- Alampat
32) अमित :- Amit
33) अनंतचिदरुपम :- Anantchidrupam
34) अवनीश :- Avanish
35) अविघ्न :- Avighn
36) भीम :- Bheem
37) भूपति :- Bhupati
38) भुवनपति :- Bhuvanpati
39) बुद्धिप्रिय :- Buddhipriya
40) बुद्धिविधाता :- Buddhividhata
41) चतुर्भुज :- Chaturbhuj
42) देवदेव :- Devdev
43) देवांतकनाशकारी :- Devantaknaashkari
44) देवव्रत :- Devavrat
45) देवेन्द्राशिक :- Devendrashik
46) धार्मिक :- Dharmik
47) दूर्जा :- Doorja
48) द्वैमातुर :- Dwemaatur
49) एकदंष्ट्र :- Ekdanshtra
50) ईशानपुत्र :- Ishaanputra
51) गदाधर :- Gadaadhar
52) गणाध्यक्षिण :- Ganaadhyakshina
53) गुणिन :- Gunin
54) हरिद्र :-Haridra
55) हेरंब :- Heramb
56) कपिल :- Kapil
57) कवीश :- Kaveesh
58) कीर्ति :- Kirti
59) कृपाकर :- Kripakar
60) कृष्णपिंगाक्ष :- Krishnapingaksh
61) क्षेमंकरी :- Kshemankari
62) क्षिप्रा :- Kshipra
63) मनोमय :- Manomaya
64) मृत्युंजय :- Mrityunjay
65) मूढ़ाकरम :-Mudhakaram
66) मुक्तिदायी :- Muktidaayi
67) नादप्रतिष्ठित :- Naadpratishthit
68) नमस्तेतु :- Namastetu
69) नंदन :- Nandan
70) पाषिण :- Pashin
71) पीतांबर :- Pitaamber
72) प्रमोद :- Pramod
73) पुरुष :- Purush
74) रक्त :- Rakta
75) रुद्रप्रिय :- Rudrapriya
76) सर्वदेवात्मन :- Sarvadevatmana
77) सर्वसिद्धांत :- Sarvasiddhanta
78) सर्वात्मन :- Sarvaatmana
79) शांभवी :- Shambhavi
80) शशिवर्णम :- Shashivarnam
81) शुभगुणकानन :- Shubhagunakaanan
82) श्वेता :- Shweta
83) सिद्धिप्रिय :- Siddhipriya
84) स्कंदपूर्वज :- Skandapurvaj
85) सुमुख :- Sumukha
86) स्वरुप :- Swarup
87) तरुण :- Tarun
88) उद्दण्ड :- Uddanda
89) उमापुत्र :- Umaputra
90) वरगणपति :- Varganapati
91) वरप्रद :- Varprada
92) वरदविनायक :- Varadvinaayak
93) वीरगणपति :- Veerganapati
94) विद्यावारिधि :- Vidyavaaridhi
95) विघ्नहर :- Vighnahar
96) विघ्नहर्ता :- Vighnahartta
97) विघ्नविनाशन :- Vighnavinashan
98) विघ्नराज :- Vighnaraaj
99) विघ्नराजेन्द्र :- Vighnaraajendra
100) विघ्नविनाशाय :- Vighnavinashay
101) विघ्नेश्वर :- Vighneshwar
102) विकट :- Vikat
103) विनायक :- Vinayak
104) विश्वमुख :- Vshvamukh
105) यज्ञकाय :- Yagyakaay
106) यशस्कर :- Yashaskar
107) यशस्विन :- Yashaswin
108) योगाधिप :- Yogadhip
बुधवार, १९ ऑगस्ट, २०२०
कशी घ्याल आपल्या मानसिक आरोग्याची काळजी?
कशी घ्याल आपल्या मानसिक आरोग्याची काळजी?
निरोगी शरीर,
रोगप्रतिकारक शक्ती , तंदुरुस्त राहा आणि आनंदी राहा असे अनेक सल्ले आपण सध्या ऐकत
असतो. पण तरीही ज्या परिस्थिती मधून आपण जात आहोत त्या स्थितीमध्ये या गोष्टी
वाटता तितक्या सोप्या नाहीयत हे हि आपण जाणतोच. नैराश्या मध्ये गेलेल्या आणि
आत्महत्या केलेल्या किती तरी घटना रोज घडत आहेत. रोगांशी लढण्यासाठी शरीराची
तंदुरुस्ती महत्वाची आहेच पण तंदुरुस्त आणि निरोगी राहण्याचा महत्वाचा भाग म्हणजे
स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे.
निरोगी,
तंदुरुस्त आणि आनंदी राहण्याचा मुख्य मार्ग आहे आपले मानसिक आरोग्य निरोगी आणि
तंदुरुस्त ठेवणे म्हणजे नैराश्याला पळऊन लावण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. आणि हो
यासाठी खूप विशेष गोष्टी करण्याची गरज नाहीय आपण फक्त खालील गोष्टींची काळजी
घेतलात तर आपले मानसिक आणि त्यामळे साहजिकच शारीरिक आरोग्यही तंदुरुस्त राहील.
शक्य तितका
जास्त सूर्यप्रकाश मिळवा
आता आपण म्हणाल सूर्यप्रकाशाचा आणि मानसिक आरोग्याचा काय
संबंध असा प्रश्न आपल्याला पडलाच असेल! तर वाचक मित्रांनो सूर्यप्रकाशाचा खरंच फार
महत्वाचा संबंध आहे आपल्या मानसिक आरोग्याशी. वैज्ञानिक दृष्ठ्या सूर्यप्रकाश हा
व्हिटामिन D चा स्त्रोत आहे, जे आपल्या शरीरासाठी आणि मेंदूसाठी हि महत्वपूर्ण
जीवनसत्व आहे. हे जीवनसत्व आपल्या मेंदू ला अशा रसायनांचा पुरवठा करत जे
एन्डोर्फीन आणि सेरोटोनीन सारख्या
मूडमध्ये सुधारणा करते. दिवसातून ३० मी ते २ तास हा कालावधी सूर्यप्रकाशात घालवणे
आदर्श असते. जेव्हा टाळेबंदी केली गेली, त्यावेळी घरातून बाहेर पडणे शक्य न्हवते
त्यावेळी बऱ्याच व्यक्तींना उदासीन आणि विनाकारण मानसिक ताण जाणवत होता अस बऱ्याच
वेळी हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात हि होत, याच कारण असत पुरेसा सूर्यप्रकाश न मिळणे
याला सिझनल एफेक्टेद डीसऑर्डर म्हणतात. यासाठी आपल्या मानसिक आरोग्यासाठी
सूर्यप्रकाश खूप प्रभावी भूमिका बजावतो.
पुरेशी झोप
घ्या
झोप आपल्या
मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी खरोखरच फार महत्वाची असते. झोपेमुळेच मेंदू ला
पुरेशी विश्रांती मिळते व शरीरातील सर्व हार्मोन नियंत्रित करण्याचे कार्य अधिक
प्रभावी होते. आपल्या भावना आणि आपली मनस्थिती ठरवण्यामध्ये झोप महत्वाची असते,
पुरेशी झोप नाही मिळाली तर आपण निराश, चिंताग्रस्त किंवा थकलेले वाटू लागतो, आणि
यामुळे विनाकारण चिडचिड होऊन आपले आरोग्य बिघडते. त्यामुळे पुरेशी झोप घ्या.
सकस आहार खा
चांगले खाणे
हे फक्त शरीराची शक्ती वाढवते इतकेच नाही तर त्याचा सरळ परिणाम आपल्या मानसिक
स्थितीवरही होतो. लोह, कॅल्शिअम आणि व्हिटामिन सी सारखी अत्यंत महत्वाची खनिजे आणि
जीवनसत्वे यांची कमतरता आपल्याला मानसिक आरोग्यासाठी हि जबाबदार राहते. तणावग्रस्त
किंवा चिंतातूर वाटत असेल तर संतुलित आहार घेण योग्य ठरू शकत.
मद्यपान आणि
धृम्रापान टाळा
मद्यपान आणि
धृम्रापान या गोष्टी चिंताग्रस्त किंवा तणावात राहणारे व्यक्ती तणाव कमी
करण्यासाठी चा उपाय म्हणून करत असल्याचे भासवतात पण याचं गोष्टी खऱ्या अर्थाने
तणाव आणि चिंताग्रस्तपणा वाढीस मूळ कारण ठरतात. मद्यपान किंवा धृम्रापान घेऊन
तात्पुरते चिंतेपासून आणि तणावातून मुक्त झाल्याचा भास होतो पण ती फक्त एक नशा आहे
हे ते लोकं ओळखू शकत नाहीत. त्या नशेचा अमल संपताच ते अधिकच उदास, चिंताग्रस्त आणि
तणावाखाली जातात आणि पण एखाद्या गोष्टी वर लक्ष केंद्रित करणे किंवा एकाग्र होणे
कठीण होते. यांच्या दीर्घकाळ वापराने शरीरात थायमिन ची कमतरता येते. थायमिन
मेंदूच्या कार्यासाठी महत्वाचे आहे, याच्या कमतरते मुळे स्मरणाची समस्या,
समन्वयाची समस्या, गोंधळ आणि डोळ्यांचा त्रास उद्भऊ शकतो, यामुळे एकूणच ती व्यक्ती
चिडचिडी आणि चिंताग्रस्त बनते.
झोपेच्या आणि
इतर गोळ्या डॉक्टरांच्या परवानगी शिवाय खाणे टाळा
अशी औषधे
तात्पुरता आराम देतात आणि बऱ्याच वेळा चिंता वाढवतात आणि शारीरिक आणि मानसिक
नुकसान करतात. अशा औषधांच्या अधिक वापराने स्कीझोफ्रेनिया सारख्या मानसिक विकृती
विकसित करू शकतात.
तणावावर
नियंत्रण मिळवा
अनेकदा तणाव
टाळता येण शक्य असत, परंतु आपणच तणावाच्या मुख्य करणाला कुरवाळत बसतो आणि तो अधिकच
वाढवतो. आपल्याला मानसिक ताण कशामुळे येतो हे जाणून घेणे आणि मानसिक आरोग्य
राखण्यासाठी काय करणे गरजेचं तणावाला समोर कसं जावे याचे नियोजन करण गरजेचं आहे.
प्रत्येक समस्सेच निराकरण केव्हा आणि कधी करू शकता याचे वेळापत्रक बनवुन आपल्या
जबाबदाऱ्या आणि महत्त्वाचे मुद्दे व्यवस्थापित करा करण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच
वेळा आपल्या तणावाची कारणे लिहून ठेवणे यामुळे तणाव व्यवस्थापित करणे आणि तीव्रता
कमी करणे सोप होऊ शकत. संकटांपासून दूर पळणे थांबउन त्यांना सामोरे जा आणि
समस्यांना तोंड द्या. समस्यांमुळे झोप येण्यामध्ये अडचण होत असेल तर मनपसंद संगीत
ऐकून आपण यावर उपाय करता येतो.
दररोज व्यायाम
करा
व्यायाम फक्त
शरीर चांगले ठेवत नाही तर मानसिक आरोग्य राखण्यामध्ये आणि ताजेतवाने वाटण्यामध्ये
हि व्यायामाचा खूप परिणाम होतो. सक्रीय राहण्याने आपण ताजेतवाने तर होताचं पण याच
बरोबर मेंदूतील रसायनांना ही उत्तेजना मिळते व आपल्याला चांगल्या मनस्थिती मध्ये
ठेवण्यास मदत करते. व्यायामाने जसे शरीर खंबीर होते तसेच मन हि खंबीर होते.
व्यायाम नैराश्या, चिंता, ताण थकवा आणि आळशीपणा दूर करण्यास मोठी भूमिका पार
पाडते. हाच व्यायाम तंदुरुस्ती आणि दीर्घायुशी देखील बनवतो हे विशेष.
आनंदी
राहण्यासाठी आनंद घेत राहा
आपल्याला
आवडणाऱ्या, मजेशीर आणि आनंद देणाऱ्या गोष्टी करण्यामध्ये वेळ देण्याचा प्रयत्न
करा. फिरायला जाने, गाणी ऐकणे, एखादा विशेष छंद असणे अशा गोष्टींसाठी विशेष वेळ
द्यायचा प्रयत्न करा. आपल्याला आवडत्या व्यक्तींशी चर्चा करा, कॉल किंवा मॅसेज
वरून संपर्कात राहा. आपल्या अडचणी, चिंता किंवा अगदी दैनंदिन घटनाही शेअर करा.
आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत अशा गोष्टी शेअर केल्याने तणाव कमी येण्यामध्ये
कमालीचा परिणाम दिसून येतो.
मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२०
जेईई आणि नीट परीक्षा निर्धारित वेळेतच: सर्वोच्च न्यायालय
सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०
नात्यांची गरज “संवाद”
नात्यांची गरज “संवाद”
जशा प्रेमाच्या व्याख्या व्यक्तीशः बदलतात तसेच नात्यांच्याही बाबतीत आहे. दोन व्यक्तींमधील बंध मग तो कोणताही असुदे प्रियकरांमधील प्रेमाचा, आईवरील प्रेमाचा, आजी आजोबा, बहिण-भाऊ, भाऊ-बाबा किंवा अगदी निखळ मैत्रीचाच बंध, हे बंध म्हणजे मला वाटतं देवानं निर्माण केलेली नाती आणि त्यातला जिव्हाळाच.
या वेगवेगळ्या
नात्यांमुळेच खरं म्हणजे आयुष्याला उभारी येते. माणूस पूर्णत्वाकडे जातो आणि
समृद्ध होतो. जर उदाहरण सांगायचं झालं तर माझच सांगेन. बहिण हे नातं इतक सुंदर आहे
की त्याची तुलना इतर कुठल्याही नात्याशी होऊ शकत नाही. मला सख्या बहिणी नाहीत
परंतु मला माझ्या चारही आते बहिनी सख्या नाहीत असे कधी वाटतच नाही. मी सगळ्यात लहान
म्हणजे शेंडफळ, आणि ह्या माझ्या आतेबहिनी, आम्ही एकत्र राहतही नाही पण तरीही आमचे
नाते अतूट आहे कारण आमच्या नात्यातील दुवा आहे संवाद .
किती अन काय
काय करू शकतो हा संवाद?
दुरावलेली,
विखुरलेली, अस्पष्ठ, अबोल नाती आणि अनोळखीही फक्त एका संवादामुळे अखंडपणे जोडली
जाऊ शकतात. चार आपुलकीचे, मायेचे आणि काळजीचे शब्द नात्याचा अतूट बंध निर्माण करतात. नाती
जपली पाहिजेत, टिकवली पाहिजेत अस फक्त म्हणत बसून नाती टिकत अगर जपली जात नाहीत.
त्यासाठी आपला स्वतःचा ५ मीनीट वेळ सुद्धा खूप काही करू शकतो. हा ५ मिनिटांचा संवाद
आपल नातं आयुष्यभर तारू शकतो.
एका संवादामुळे
माणसाचा मूड कळू शकतो, संवाद हि शब्दांची देवाण घेवाण नसून ती भावनांची देवाण
घेवाण आहे. त्यामुळे स्वभाव आचार-विचार आणि एकूणच संपूर्ण व्यक्ती कळून येते. आमची
वाचकांना एक विनंती आहे कि आपण स्वतः आठवा की आपण कोणत्या नात्याला वेळ देत नाही
आहोत, देऊ शकत नाही आहोत किंवा देणारच नाही आहोत! या महामारीचा काळात टाळेबंदी मुळे
एकमेकांची प्रत्यक्ष भेट होणे सहज शक्य राहिलेलं नाहीये, पण यामुळे नाते तुटू न
देणे हे आपलेच कर्तव्य असते. कारण नाती आयुष्यभराची, सुखादुखाची सोबती असतात.
जर दुरुवा आलाच
असेल, चिडचिड आणि अबोला वाढतच असेल तर ते तुमच नातं तुमचा वेळ मागत आहे. अशा वेळी
तुम्ही केवळ त्या तुमच्या नात्याला ५ मीनीट वेळ देऊन बघा. हा ठरवून केलेला संवाद ५
मिनिटे ओलांडून कधी एक तासाचा होऊन जाईल तुम्हालाच कळणार नाही.
चला तर मग या
ओढावलेल्या दुराव्यामध्ये संवाद हे एकच माध्यम ठेऊन नाती जपण्यासाठी
सगळ्यांनीच प्रयत्न करूयात.
धन्यवाद.
©Team E Times Today
अशाच नवनवीन माहिती साठी, लेटेस्ट बातम्यांसाठी वाचत राहा
E Times Today
विचार मंथन , अनुभव , नातेसंबंध, प्रेरणादायी कथा, प्रेरणादायी लेख, मनातील हितगुज, मनातील गप्पा, Article, blog,
शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०
प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशा गोष्टी
प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशा गोष्टी
आपल्या भारताबद्दल काही अशा गोष्टी ज्या वाचून प्रत्येक
भारतीयाला आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटेल.
आपण सगळे जाणतो कि भारत एक अप्रतिम राष्ट्र आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा आपला देश इतकेच नाही तर भारत सर्वात प्राचीन संस्कृती सुद्धा आपली आहे. अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या भारताला एकमेव आणि अप्रतिम देश सिद्ध करतात, या गोष्टींचा आपल्याला नक्कीच अभिमान आहे. चला तर याच फाक्ट्स बद्दल माहिती घेऊ,
भारतीय अवकाश संशोधन :
भारतीय अवकाश संशोधन हे
जगातील top ५ अवकाश संशोधक देशांपैकी एक आहे.
तसेच पहिल्याच प्रयत्नात मंगल मोहीम यशस्वी करणारा भारत एकमेव देश आहे.
सर्वात मोठी शाळा :
विद्यार्थी संख्येनुसार जगातील सर्वात मोठी शाळा ही भारतात
आहे, लखनौ मधील सिटी मोन्तेस्सोरी स्कूल
हे त्या शाळेचे नाव असून या शाळेमध्ये ६४हजार विद्यार्थी आहेत.
सर्वात मोठा फिल्म निर्माता देश:
भारत हा जगातील सर्वात
मोठा फिल्म निर्माता देश आहे. प्रत्येक वर्षी सर्वात जास्त फिल्म भारतातच प्रसिद्ध
होतात.
सर्वात मोठा दुग्ध उत्पादक देश:
भारत जगातील सर्वात मोठा दुग्ध उत्पादक देश
आहे. भारतात म्हैस, गाय या प्राण्यांपासून दुध मिळवले जाते.
सर्वात मोठे रस्तेवाहतुकीचे जाळे :
भारतात सर्वात मोठे रस्ते
वाहतुकीचे जाळे आहे, हे रस्ते वाहतुकीचे जाळे
1.9 मिल्लिअन मैल इतके प्रचंड आहे.
मार्शल आर्ट, बुद्धिबळ आणि इतर खेळ :
मार्शल आर्ट ची निर्मिती भारतामध्ये झालेली
आहे, तसेच बुद्धिबळ, खो-खो आणि इतरही बरेच खेळ आहेत ज्यांची सुरुवात भारतात फार
प्राचीन काळापासून झाली आहे.
स्वीजरर्लंड चा राष्ट्रीय विज्ञान दिवस :
हे वाचून नक्कीच अभिमान वाटेल कि स्वीजरर्लंड चा
राष्ट्रीय विज्ञान दिवस हा २६ मे आहे , आणि
हा दिवस Dr, A P J Abdul Kalam सर यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आल आहे. कलाम सर
यांनी २६ मे रोजी स्वीजरर्लंड ला पहिली भेट दिली होती.
सर्वप्रथम चंद्रावर
पाणी भारताने शोधले :
पृथ्वीचा एकमेव उपग्रह असलेल्या चंद्रावर सर्व
प्रथम पाणी असल्यानचा महत्वपूर्ण शोध आणि पुरावे भारताने प्रसिद्ध केले आहेत.
शाम्पू चा शोध :
केसांच्या आरोग्यासाठी
हल्ली शाम्पू चा वापर खूप होतो, देशविदेशी खूप कंपन्या शाम्पू बनवतात पण सर्वात
प्रथम शाम्पू चा शोध आणि वापर भारतामध्ये झालेला आहे.
कुंभमेळा :
भारतातील कुंभमेळा हा
जगातील सर्वात मोठा असतो, याचा अंदाज आपल्याला यावरून येईल कि कुंभमेळा
आकाशामधूनही पाहता येतो.
शांतताप्रीय देश:
होय आपल्या भारत देशास
जगभरात शांतता प्रिय देश म्हणून ओळ्खल जात, याच कारणही तसच आहे. भारत देशाने कधीही
स्वतःहून कोणत्या देशावर आक्रमण केलेलं नाहीय.
© Team E Times
अशाच नवनवीन माहिती साठी, लेटेस्ट बातम्यांसाठी वाचत राहा
E Times Today
अभिमानास्पद , भारतीय, भारतीय गोष्टी, top भारतीय फाक्ट्स ,
भारतीयांचा अभिमान , Proud to be
an Indian, India The Great Nation, The Great India, The Great Nation, Best
Nation, India, Facts we should be Proud as an Indians, Proud Indians .